Theft!

It is not easy to share a flat with two girls who are 10 years younger than you. Not because they tend to take advantage of you or get their boyfriends over or they drink alcohol but maybe because they earn more. Suddenly I received a blow from behind and hit the grill that was near the door, the physical pain did not bother me so much as much I was emotionally hurt. I had a good marriage but my husband received an offer to work abroad that he could not turn down, in short, he chose money over me and I chose self-respect. What would I do if I go with him? I would not get much work there as I did translations from Gujrathi to Marathi. That too written translations as I cannot really converse in Gujrathi. We had already talked about this before getting married, he had promised me that we will stay in India. He broke the promise. I could not move back with my parents and burden them. It’s not like the old times that people might boycott you but people ask questions and they tend to give you the looks I didn’t want to put my parents through all that. So I decided to move out of the city that we lived in. 

I am good at my work but won’t really call myself the smartest of the lot. I am beautiful, but that doesn’t mean I would be with another man for his money when I am not divorced. What I am ok with is using other women’s money so that at least my character isn’t questioned. 

My station arrived, I didn’t even have to move a muscle, one push and I was out on the platform, the second blow was in my stomach that’s something that I did mind. I had to use the washroom. Before leaving the office I usually use the washroom but nowadays before I leave the local train I generally feel the need to go again. Seems it must be my growing age. Now on my way home, there is no clean washroom that I can go to, also once I reach home the two young girls might not even hear the doorbell, even if they do they are going to argue about who’s turn it is to open the door. This will definitely waste a minute. That minute is so important for my bladder which they won’t understand till they cross their 40’s. Nowadays just like my bladder control has diminished so has my ability to control my urine. The feeling of getting old is the worst. My marriage wasn’t really a success and I don’t have any kids as well, I can’t even go back to my parents as I would only make them unhappy. So now it’s just me and these two girls. That’s all that I have in life. We have a decent house that has all the amenities like TV, fridge wardrobes, beds, sofas, etc. But I haven’t bought any of them. I somehow manage to pay a small monthly rent for all the rest the girls take care of. I feel really ashamed sometimes. I would have asked my husband for a loan but now he is in a live-in relationship with another woman. And now with them together I can’t even let him see me vulnerable. 

Aah I am almost here in the parking but it’s still 6 floors to climb, unfortunately, the elevator broke down yesterday. At least I won’t have to wait that extra minute as I have the keys to the flat. The girls have gone out for a trip with their friends from the society. I start to look for the key in my purse, but can’t seem to find it, I always make sure the key is in the same section of my purse just to keep it safe. The girls always leave their stuff outside in the house. I always feel burdened by their favors. I try to lighten my burden by doing chores around the house like cleaning up, cooking, laundry, but the feeling still stays. They could actually hire someone like me for a 24hr job at their house and even I am aware of this fact, they can afford it. I still can’t find the keys. Where did it go? M sure it was here. Because I locked the door in the morning on my way to the office. And I don’t remember taking it out after that. I had kept my purse safely in my drawer in the office too. Panic swell within me. On top of this, the bladder was also not helping. I decided that’s it I have to find the keys first. The neighbours’ set was out of the question too as they had gone out with the girls. What should I do?? 

It’s been almost an hour now. I haven’t come up with anything yet. Where can I have lost it? Was it on the local trains? Have I gotten so old now that I can’t even remember so much? My mind was racing. What if the girls come early? Omg, what will I tell them? I can’t lose the keys like this. It felt as if I had burned the house down that I don’t even own. When I was six I had gone to stay at my uncle’s place, he had just bought a new house in Pune. For us, it was like a mansion. None of us had ever been able to afford such a big place in my whole family. We used to play around the house. One day while we were playing I was running ahead and my brother was trying to catch me. I suddenly turned around to see if Mihir was chasing me and I bumped into the television. A loud bang and the television fell on the floor. Followed by a whole lot of silence. I can’t even remember me crying, I was stunned I couldn’t even remember hearing a word. My mom was so scared of how my uncle would react. All I remember is my father telling my uncle he will pay for the damage. After that, I remember my father started working overtime. He used to come home late, my mother would feed me and tuck me in and wait for my father to come and eat together. In spite of my mom putting me to bed, I couldn’t fall asleep for all the days that my father did late nights. In the morning when dad left for work I would hug my mom and cry feeling apologetic. I can feel the same feeling creep in right now. And it’s been years since I felt like this. I had never apologised to my parents for that mistake. My mom always said, “the burden of favours is always too much to repay. I hope you understand someday”. I wanted to prove her wrong. This time I would ask for forgiveness. I wanted to do something so out of the world for them that the favours would seem repaid. I would pay for the duplicate keys and all the sets that would be my penance. After all, I am the eldest. It has to be my responsibility.

My stomach has started to kill me now. But what if I leave and the girls come back? They are returning tonight itself. It’s been two hours since I arrived. I checked my watch omg it’s half-past nine already. All I can think of is the public toilet nearby. But I can’t leave now because if they come and I am nowhere to be seen and the door locked, I’m sure they will worry as I never go anywhere except the house and my office. Vishakha had also asked me “you will be here when we come back right??” They don’t have the keys,  they carry but sometimes they forget to take it. It’s ok because I am always home. If I make them wait outside their own house it won’t be good. They might think that I disappeared. And if they decide to go and wait at Mrs. Shah’s house I will have to give them the news in front of her that I lost my key. It’s better I wait here once they arrive I will tell them and make them wait here.. or should I quickly get the key maker? What if he breaks the latch, the house is a rental and I haven’t even given any deposit. That’s a big NO. 

I started down the stairs. I tried to tell my mind that I don’t have to go, but the Samosa that I had at Mr. Surve’s sendoff is making my stomach upset. The worst has come true now it’s not just pee now I have to empty my stomach too. I crossed the road, and I took out 5 rupees from my purse. They must keep the toilets clean as they charge money I thought, also at the same time praying that the girls should not come back before I return. I entered the toilet and saw that there was a big queue. I just can’t put the finger on how the time went and my turn to use the washroom came and ahh finally I felt free. My knees were hurting badly as turning forty seems to have taken its toll on me, also this was the 12th or 13th floor that I had to climb in the whole day. Unfortunately, my office is also on the third floor and has to climb up and down a few times there too. By the end of the day, I get really tired. I Strained my ears to listen if I could hear anyone or anything, but our building still seemed quiet. I felt relieved.

I climbed to our floor and sat on the staircase. I didn’t feel quite comfortable so I looked and to my surprise the door of our flat was open. So Vishakha had taken the keys, I thought. Relieved, I entered and started taking out the snacks that I had got for the girls. And I was shocked to see that the television was gone, so was Pallavi’s laptop which usually is kept on the couch. The cupboards were wide open. I had saved some gold for the girls it was also gone. The drawer in Pallavi’s wardrobe was empty. Vishakha’s purse was gone, my feet went cold and the snacks fell on d floor. I turned back to see Vishakha, Pallavi, Mrs.Shah all standing in the door all of them speechless, me too. It was as if not just the things but my spine was stolen too. I was again speechless. Trust me I really wanted to apologise this time!!

Translation: Mrunmayee Bhave

आदिती

शेवटचा अर्धा तास राहिला होता मस्टरवर सही करायला अाणि बायोमेट्रिकवर बोट उमटवायला. दर तीन सेकंदाला तिला घड्याळ बघावसं वाटत होतं. आज तिचा कामाचा शेवटचा दिवस होता. घरी स्वागत करायला कोणीही नव्हतं. मुळात घरी नोकरी सोडल्याचं कळवलंच नव्हतं. कामावर तिला कोणीही सेन्डॉफ वगैरे दिला नव्हता. ती सोडून कोणालाच याची जाणीव नव्हती की शेवटचा दिवस म्हणजे तिच्या मनात कसली चलबिचल चालू असेल. सगळे जण त्यांचा त्यांचा आनंद व्यक्त करण्यात मग्न होते. तिला वाटत होतं किमान तोंडदेखलं तरी त्यांनी एक दिवस थांबायला हवं होतं. मग केक कापून साजरा केला तिचा नसण्याचा दिवस तरी चालेल.

डोक्यावर पंखा चालू होता. साडे चार वाजले होते. निघताना घ्यायच्या चहाची वेळ झाली होती. तिनी कपाट आवरलं होतं. सगळी पुस्तकं जवळ घेतली होती. तिच्या नोट्स घेतल्या होत्या. कॉम्प्युटर वर असलेले सगळे प्रेझेन्टेशन्स डिलिट केले होते. या अर्ध्या तासात करायला काहीच नव्हतं. टीचर्स रुममध्ये अजून १० शिक्षक असून तिला एकटं पडल्यासारखं झालं होतं. ती कॉलेजमध्ये असताना तिच्या लाडक्या मॅडम याच खुर्चीत बसायच्या. त्यांच्या काल्पनिक आणि भावनिक अस्तित्वाचाच जो काय तो आधार. चहावाला आला. रोज अर्धा कप चहा तिच्याकडे बघता आदाळणारा मुलगा आज शिगोशीग कप भरत होता. तिचे हात थरथरत होते. एक ध्येय होतं. शांत बसायचं. कितीही राग आला तरी बोलायचं नाही अाणि कितीही वाटलं तरी भांडायचं नाही. सध्या ह्या कपातून चहा सांडू द्यायचा नाही. “उद्या नाय म्हनं तुमी? ते समोसा आनलेला. भेट द्यावी म्हनलं”. ती खाडकन्जागी झाली. चहावाल्या पर्यंत ही बातमी पोहचली तर? “कोण म्हणालं?”. “पोरं. गलका करुन कायबाय बोलताना एेकलं.” तिला उत्सुकता निर्माण झाली. मुलं आपल्याबद्दल वाईटच बोलणार अाणि तरीही आपण ते एेकायचं. मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी, ते चांगलंच बोलतील या आशेच्या आहारी जाऊन. “काय म्हणाली?”. “तुमची गेली, आमची बी घालवता का? कोनी पाह्यलं हितं बोलताना तर? गेलीच समजा. भेटाया या मला मागनं. सांगतो.” तिनी पुढे सरसावलेली मान भानावर येऊन मागे घेतली. तो चहावाला निघून गेला.

टीचर्सपैकी कोणालाही ती पसंत नव्हती. तिला सगळं डिटेल लागायचं. डिटेल अभ्यास, डिटेल पेपरचेकिंग अाणि मुलांना समजलंय ना नक्की याची डिटेल खात्री. ती काम झपाट्यानं करायची. पण तोच इतरांचा प्रोब्लेम झाला. कॉलेजमधल्या मुलांना आपल्याला कोणत्या दर्जाचं शिक्षण मिळू शकतं याची तिनी जाणीव वगैरे करुन दिली. मग टारगट पोरांनी भिंतीवर काहीबाही लिहिलं, कोणी बेंचवर कर्कटक चालवलं. कोणी वर्गात विमानं उडवली आणि त्यावर मेसेज लिहिले. कोणी तिला थेट मोबाईलवर गाठलं. पण तिला कधीच राग आला नाही. ती शिकत असताना तिचे मित्र मैत्रिणी हेच करायचे. तिला त्यात कधीच रस नव्हता, पटायचंही नाही. पण फक्त टाईमपास एवढाच त्यांचा उद्देश असतो हे तिला पक्कं माहित होतं. “मुलं आपली मित्र होऊ शकतात पण आपण त्यांची मैत्रिण मात्र व्हायचं नाही.” हा तिच्या लाडक्या मॅडमचा कानमंत्र तिच्या बरोबर होता.

चहावाल्यामुळे तिला कॉरिडॉरमधून जाण्याचा धीर आला. सगळे आपल्याला हसले तरी चालतील पण आपण रडलो अशी प्रिन्सिपल सरांनी केलेली तक्रार तिला नको होती. वर्गात झालेल्या त्या नकोश्या प्रकरणाचा तिला त्रास झालाच होता पण ती रडली नव्हती. वर्गात मुलांसमोर तर नाहीच नाही. आपण स्त्री आहोत म्हणून आपली केलेली मस्करी आपण आपल्या लिंगाशी जोडायची नसते. प्रत्येक पुरुष शिक्षकाला मुलं मान देतात अाणि लेडीजना टारगेट करतात असा विचारही मनाला शिवून जायची परवानगी नव्हती. तिनं अर्धा कॉरिडॉर पार केला. तिच्या वर्गात शांत बसणारा, लक्ष देणारा आणि चांगला अभ्यास करणारा एक मुलगा पायरीवर बसला होता. त्यानं तिच्याशी नजरानजर करुन एक चिठ्ठी सोडली. तो निघून गेला. ती घ्यावी तरी प्रोब्लेम अाणि सोडावी तरी. त्याला मित्र करुन घेतोय की आपण मैत्रीण होतोय याच्या काठावर असताना तिनी सरकन्चिठ्ठी घेऊन कॅंटिनची वाट धरली. घाबरतच चिठ्ठी उघडली. “नका जाऊ, नाहीतर मी शिक्षण सोडून देईन.” तिला धस्स झालं. आजकाल मुलं डिप्रेशनमध्ये जातात, आत्महत्या करतात, त्याचे आळ शिक्षकांवर येतात, खरंतर जबाबदारी येते याची तिला आठवण झाली. तिनी कॉलेजमध्ये पाऊल टाकलं त्या दिवशी तोर्यात लेक्चर दिलं होतं. “गोष्टीच्या मुळाशी जा, समजून घ्या, शिक्षणाला मार्कांचं युनिट लावू नका, शिक्षण मोजता येत नाही, फक्त घेता येतं, दिलं तरी मिळतंच रहातं. असंच शिका नाहीतर शिक्षण सोडून द्या!” त्या दिवशी तिला वाटत होतं, एक जरी विद्यार्थी असा घडला तर आपल्या आयुष्याचं चीज झालं. पण आज ती हेच ध्येय्य सोडून पळपुटेपणा करीत होती.

कॅंटिनमध्ये तिला आलेलं पाहून चहावाला तिच्यापाशी आला. एका टेबलपाशी बसला. ती ही बसली. आजूबाजूला बघितलं तर बरेच ओळखीचे चेहेरे होते, चहावाल्याबरोबर तिला बघून कुजबुजत होते. तिनी दुर्लक्ष केलं. “कशाला हितं वेळ घालवताय. आमचे आन्ना कॉलेज काढायचं म्हनतायेत. पैसा रगड . पन शिकलेलं कोनी नाई. हे असलं टाईमपासचं कॉलेज नकोय म्हनले. शिकवत्यात त्ये कॉलेज काढुया म्हनले. तुमाला पैशे दिले तर देताल का काडून?” तिला काय बोलावं काही कळेना. “हितल्या पोरांना कुटं काय येतं. नुसती येतात आनि खातात, आनि जातात. आपुन खरंसच्चं कॉलेज काढुया म्हनले.” तिनी शब्दांची जुळवाजुळव केली. “मी नाही शिकवणार आता. माझी पद्धत पटत नाही कोणाला. तुम्ही दुसऱ्या कोणाला विचारा.” तो हसायला लागला. तिला काही समजेनासं होतं. “तुमाला राग येतो की नाई हो. येड्याचा बाजार भरलाय नुसता आनि तुमी मासळी बाजाराला लावताय शिस्त. पोरांना कसले शिकवता अाधी मास्तरला शिकवा.” तो परत एकदा मोकळेपणानी हसला. “मला चालेल. पण कॉलेज पोरांसाठी नको, अशा मास्तरांसाठी काढुया का?” त्याला ही कल्पना आवडली होती. इतक्यात समोरुन एक सर दोघांकडे बघून कुत्सित हसून निघून गेले. ती शांतच होती. त्याला मात्र राग आला. “कशाला एेकून घेता? एकेकाला मुस्कटवत जा”. आता ती मोठ्यानं हसली. “मला राग येत नाही. पण मला शिकवता येतं. ते आले आपल्या कॉलेजमध्ये की समजावेन मी अशा विद्यार्थ्यांना”. दोघंही हसले. “जरा कोणी बोललं तर अंगाला भोकं पडत नाहीत. उलट उत्तर दिलं की मोकळं वाटतं आणि सोडून दिलं की शांत! मला नोकरी सोडल्याचं आज फार शांत वाटतंय!”

Photo by rawpixel.com on Pexels.com

डोंबारीण

सकाळी सकाळी भावावर डोकं सटकलं होतं. एवढीच अपेक्षा होती की माझ्या फेयरवेल पार्टीला मला ड्रेस घ्यायला, त्यानं त्याचं क्रेडिट कार्ड मोकळेपणानं द्यावं. मी किमान ८५ वेळा त्याची सिक्रेट्स लवपली होती अाजपर्यंत. सिग्रेट पासून मुलींपर्यंत. महिनाअखेर म्हणे! हे काय कारण झालं का? अाणि क्रेडिट कार्ड तर मागितलं होतं. बरं मी कधीच दीड हजाराच्यावर ते स्वाईप करत नाही, हे माहितीये त्याला. त्याचे पैसे वापरते मी, उकळत नाही. मला ते अावडतंच नाही! काय झालं असतं? मी ड्रेस घेतला असता, घातला असता अाणि मग शांतपणे तो कपाटात लपवला असता. अाईला कळलं सुद्धा नसतं! त्यानं ‘नाही’ म्हणणं, प्लॅनमध्ये नव्हतंच अजिबात. पण दिला दगा. मग मी पण काही कमी नाही. तो बाहेर गेल्यावर सरळ त्याच्या कपाटातून सगळी मिळालेली लव लेटर्स जमिनीवर सांडून अाले. अाता बघेल अाई अाणि व्हायचा तो तमाशा होईल. नाहीतरी अामच्या दोघांतलं बॉंडिंग जाम बिघडलंय. अाजकाल तो काही गिफ्ट देत नाही की मला उशीर झाला तर घ्यायला येत नाही. काहीतरी जाम गंडलंय! पण काय ते कळत नाहीये! शून्य संवाद, शून्य प्रेम! अाधी असा नव्हता दादा. अामच्या ना अाता चॉईसेस बदलल्या अाहेत. मी इंडिपेंडेंट झालीये. सगळीकडे माझी गाडी घेऊन जाते. त्याला माझी प्रगती अावडत नसणार. तो जळत असणार माझ्यावर किंवा माझा एखादा मित्र अावडत नसेल. किंवा एखादी मैत्रीण अावडत असेल! काय ते माहित नाही. पण पटत नाही. अाम्ही एकमेकांसाठी काहीही करत नाही अाणि केलं तर ते त्रास द्यायलाच करतो! त्यात अाता ही सुरभी नावाची मैत्रीण भेटायला येणारे मला. तिचं अाणि तिच्या भावाचं फारच मस्त पटतं. त्यानी तिला प्ले स्टेशन दिलेलं मागच्या वाढदिवसाला. ती रोज भावाचं कौतुक करते अाणि अाजकाल मला त्याचा फारच त्रास होतो.

एक नेहमीसारखं चिंगूपणे चीज घातलेलं अॉमलेट घेऊन मी कमीत कमी ऊन असलेलं टेबल शोधलं. सुरभीचा मेसेज अाला, ‘उशीर होतोय’. बरं वाटलं. अाता किमान शांतपणे खाता तरी येईल. पण कसलं काय. काहीतरी टणटणलं जवळच. कसला तरी वाद्यांचा अावाज. डोंबारी करतात तसा. झालं! अाता हे येणार अाणि डोक्याशी ती वाद्य बडवत बसणार. ह्या गरीब लोकांविषयी, सिग्नलवर भीक मागणाऱ्यांविषयी लोकं एकतर कीव आणि दया दाखवून बोलतात किंवा सरळ बोलतंच नाहीत. पण मला असा दिखावा करण्याची गरजच नव्हती. मला राग येतो या लोकांचा. अनेकदा हातीपायी धड असतात पण कामधंदा करत नाहीत. वाद्यांचा अावाज वाढत गेला. एक डॅशिंग बाई, तिच्या मागे १५-१६ वर्षांचा एक मुलगा, ७-८ वर्षांची एक मुलगी अाणि एक दोनेक वर्षांचं मूल, असा सगळा लवाजमा चालत अाला. मला टाईमपास नव्हता, म्हणून मी बघत बसले. कानात माझे इयरफोन्स घातले. त्यांचं ते बेसूर तुणतुणं माझ्या थेट मस्तकात जात होतं.

झपाझप डांबरी रस्त्याला भोकं पाडून त्यात बांबू रोवले. बाई ठिय्या देऊन वाजवायला बसली. मुलीनी एक लांब लाठी, एक रिंग असं सामान काढलं. अंगातून हरप्रकारे रिंग घालण्यात अाणि काढण्यात ती मग्न झाली. मुलाचे ते खांब अॅडजस्ट करुन झाल्यावर बाईनी एका बाजूनी एक खांब धरला अाणि त्या दोनेक वर्षाच्या बाळानी दुसऱ्या बाजूचा. त्याला साधा स्वतःचा तोल सांभाळता येत नव्हता, पण ५ बाबूंचं एक असा उभा राहिलेला डोलारा त्यानं सांभाळला होता, ज्यावर त्याची मोठी ताई अाता चढली होती. कोणीच कोणाशीच काहीच बोललं नाही. ना ती मुलगी तिच्या दादाला म्हणाली की, “मी पडले तर सांभाळ हं!”, ना तो भाऊ त्याच्या छोट्या भावाला म्हणाला, “बांबू नीट धर!”, ना ती अाई कोणाला काही म्हणाली. संवादाशिवाय त्यांचा खेळ सुरु झाला. ती लहान मुलगी एकदा काठी धरुन, एकदा चप्पल घालून, एकदा परातीत उभं राहून, त्या दोरीवरुन चालत होती. भाऊ बरोबर, तिच्या बाजूनं चालत होता. पण तिला पकडायला तो सज्ज अाहे, अशी शंकाही कोणाच्या मनात अाली नसेल. तिच्या दादानं तिला प्ले स्टेशन दिलं असेल का कधी? की ते तासन्‌तास खळखळून हसत, गप्पा मारत बसले असतील? संवादामुळे त्यांचं नातं अबाधीत असेल? की ती खरंच पडली असेल अशी एकदा दोरीवरुन अाणि त्यानं झेललं असेल? कसं असेल यांचं रक्षाबंधन? की यांच्या नात्यात भावाची वर्षातून एकदा खुंटी बळकट करत नाही बहीण? अाम्ही तरी का करतो? राखी बांधली नाही तर अाम्हाला गिफ्ट मिळत नाही पण भाऊ असणारच असतो ना पाठीशी? मला काहीही सुधरत नसताना, माझ्यासमोर सुरभी येऊन बसली. तिच्या दादानी तिला दिलेलं क्रेडिट कार्ड समोर ठेवलं अाणि मी माझं ठेवेन या अपेक्षेने माझ्याकडे बघितलं. मी तिच्याकडे एकदा नजर टाकली. नवीन जम्पसूट होता. केस अाज कलर करुन अाली होती. लिपस्टिकही नेहमीपेक्षा वेगळी होती. पण ती एक नजर पुरेशी झाली. त्या काही मोजक्या क्षणांपलीकडे ती माझं लक्ष वेधू शकली नाही.

मी परत माझ्या मैत्रिणीकडे वळले. अाता ते संगीत मधुर वाटत होतं. त्या हालचाली मोहक वाटत होत्या अाणि त्या चिमुरडीच्या चेहऱ्यावर एक अात्मविश्वास होता. ‘मी पडणार नाही’ असा अात्मविश्वास नव्हताच तो! ‘मी पडले तरी मला लागणार नाही’ असा असेल कदाचित! सगळ्यांनी सतत अाजूबाजूला असायलाच हवं असतं का? माणसं त्यांच्या त्यांच्या जागी असतील अाणि वेळ अाली की मगच अाजूबाजूला प्रगटली तर? नाही चालणार का? क्रेडिट कार्ड तर क्षुल्लक वाटतंच होतं अाता पण लहानपणापासून बरंच काही चुकतंच गेलंय, असंही वाटलं. त्यांचा खेळ संपला होता.

ते लहान मूल सगळ्यांसमोर जाऊन हात पुढे करुन उभं होतं. अाशाळभूतासारखं. सगळ्यात जास्त पैसे त्यानं गोळा केले. त्याला पैसे म्हणजे काय याची जाणीव असेल? त्याला माहित असेल की तो डेबिटवर जगतोय अाणि तो ज्यांच्याकडे पैसे मागतोय त्यातली अनेक लोकं, क्रेडिटवर मोठमोठ्याला गोष्टी घेतायेत? मुळात त्याला ही दरी म्हणजे काय? हेच माहित नसेल ना? त्यानं सगळी नाणी त्याच्या अाईच्या पुढ्यात अाणून टाकली. सगळा पसारा अावरुन ते एका कोपऱ्यात जेवायला बसले. भाकरी होती अाणि काहीतरी चटणी सारखं असावं. सगळ्यात अाधी ते लहान बाळ जेवलं. सगळ्यांनी जेवू घातलं त्याला. मोठा मुलगा त्याची भाकरी घेऊन दुसऱ्या झाडाखाली गेला. मुलगी अाणि अाई एकमेकींशी काहीही न बोलता जेवल्या. त्या जेवताना ते बाळ एकदा रस्त्याच्या मध्येच गाड्यांच्या रहदारीत गेलं. त्याच्या जीव काही क्षण धोक्यात गेला, तरीही मला बरं वाटलं. असं वाटलं, ह्या बाळात काहीतरी असं अाहे, जे इतर बाळांसारखं अाहे. काहीतरी अाहे जगात, जे ह्याला समजत नाही. ज्याचं गांभीर्य ह्याच्यापर्यंत पोहचलं नाहीये. ज्यानं त्याला प्रौढत्वं अालं नाहीये. सुरक्षेचा तर मुद्दाच नव्हता. त्याच्या दादाची, त्याच्यापेक्षा मलाच जास्त खात्री होती. खात्रीप्रमाणेच, दादानं झपकन्‌ त्याला उचलून अाईपाशी टाकलं अाणि अापलं झाड गाठलं. ह्याच दादानं ह्या बाळाला भीक मागायला शिकवली असेल? त्यानं केलं तसं बारीक तोंड अाणि अधाशी चेहरा करायला कोणी शिकवला असेल? कसं काय त्यानं तो चेहरा ग्रास्प केला? त्याला सांगण्यात अालं असेल की अाईचं जसं सकाळी तोंड असतं, तसंच कर! अधाशी चेहरा तर त्यानं रोजच बघितला असेल ना? जेवण झालं, सामान काखोटीला मारलं अाणि ते बिऱ्हाड निघालं. लहान मूल बागडत, ती छोटी हिरॉईन तिची काहीतरी हेयरस्टाईल करत, दादा ओझं वाहत अाणि अाई तंबाखू मळत!

अाणि मी? मी राहिले त्या तुटपुंज्या चीजकडे बघत; सुरभी क्रेडिट कार्डासमोर, माझ्या डेबिट पैशांचं अॉमलेट अधाशीपणे गिळत, तिच्या भावाचं कौतुक करत, माझ्या भावाशी तुलना करत पण माझ्या कानात घुमत राहिलं ते एकच तुणतुणं!

चोरी

स्वतःपेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या दोन मुलींबरोबर फ्लॅट शेयर करुन राहणं सोपं नाही. त्या डोक्यावर बसतात, बॉयफ्रेंड घेऊन येतात, दारु पितात म्हणून नाही किंवा माझ्या मुली-भाच्या लागत नाहीत, म्हणूनही नाही. त्या माझ्यापेक्षा जास्त कमवतात म्हणून असेल कदाचित. मी माझ्या अ  काऊंट मध्ये आत्तापर्यंत सगळा मिळून जेवढा मोठ्ठा आकडा बघितला असेल, तेवढा त्यांचा एका महिन्याचा पगा   र असेल. दाराजवळच्या ग्रिलवर दात आपटला आणि माझ्या विचारांची link तुटली. मुंबईच्या second class local मध्ये बायकांच्या गर्दीत चिकचिकाट सहन करत मी उभी होते. मागनं जोरात धक्का बसला असला तरीही मी धक्का देणारीकडे वळूनही बघितलं नाही. तिचाही नाईलाज असणार आणि ओरडून काहीही उपयोग नाही हे ठाऊक होतं. माझ्याच सारखी ती. आमचं एकच नाव- first  class न परवडणाऱ्या बायका. पदरानी ओठ टिपून घेतला आणि बाहेर बघायला लागले. जरासं दुखत होतं, पण या किड्यामुंग्यांसारखं जगताना मनात जितकं दुखतं त्याची या शारीरिक धक्कयांना सर नाही.

मी रडकी, बिचारी, पै न्‌ पै वाचवणारी बाई कधीच नव्हते. गार्डनच्या साड्या नेसून मानेवर पर्फ्युम उडवून नवऱ्याच्या हातात हात घालून सिनेमातल्या बाश्कळ विनोदांवर हसणारी बाई होते. इतर बायका जिला सहज जज करतील, नावं ठेवतील आणि मनातल्या मनात हेवा करतील अशी. पण मी तशी होते. आता तशी अजिबात उरले नाहीये. माझा divorce झाला नाहीये किंवा विधवा झाले असंही नाहीये. माझा नवरा गेला पण तो परदेशात. लग्न करताना माझी एकच अट होती. मला भारतातंच रहायचं होतं. मलाच काय, त्याही भारतातंच रहायचं होतं. पण परदेशातली बदली आणि त्याबरोबर मिळणारा भरपूर पगार बघून त्याचं मत बदललं. त्याला परदेशातली ऑफर सोडता आली नाही. मी जायचं नाही या मतावर ठाम होते. अगदी मी किंवा नोकरी असा पर्याय त्याला निवडायला लावेन इतकी ठाम. एके दिवशी तो निघून गेला. थोडक्यात त्याला माझ्यापेक्षा पैसा महत्त्वाचा होता आणि मला त्याच्यापेक्षा स्वाभिमान. कोणीतरी कशाशी तरी आपली तुलना करतंय आणि त्यात आपलं पारडं हलकं ठरतंय, हे feeling फार मोजकी लोकं सहन करु शकतात. त्यातली मी नाही. माझ्या बाजूला बसणाऱ्या बाईच्या साडीला जर कुणी नावाजलं तर दुसऱ्या दिवशी एका नवीन साडीछी घडी मोडून ती प्रशंसा माझ्या साडीवर खेचून आणणारी मी आहे. पण नवरा सोडून गेला तसं तसं हरल्यासारखं वाटायला लागलं. “अगंबाई बायको पुढं का कोणी पैसा निवडतं? आणि त्यानं आपल्याला सोडावं अशी वेळच का आणायची?” ही वाक्य अनेक अशा बायकांच्या तोंडून एेकलं, ज्यांचे नवरे केवळ संधीअभावी त्यांना धरुन होते. बरं त्यानी मला सोडलं, तसंच मी ही सोडलं की त्याला. लटांबर म्हणून मी नाही मागे मागे गेले. कित्तीतरी बायका जातात. पण  तिथे जाऊन मी काय करणार? मराठी आणि गुजराती ट्रान्सलेशनचं असं कितीसं काम मला मिळणार? पुन्हा तोंडी. गुजराती मला लिहिता तरी कुठं येतं? तरीही. लग्नाआधी आमचं ठरलं होतं, भारतात राहायचं. पण त्यानं ते प्रॉमिस मोडलं. मग माझा तोरा काय कमी होता? आधी आई-बाबांकडे परत आले तर त्यांनाही जड झालं. आर्थिक दृष्ट्या नाही पण उत्तरं किती जणांना देणार? पूर्वी सारखं आता कोणी सरळ वाळीत वगैरे टाकत नसलं तरी दुसऱ्याला त्यास होईल इतपत नजरांचा भडिमार करतातंच माणसं. “ही का गेली नाही?” “वेगळाच काही problem होता का?”, “मुलीचा स्वाभिमान म्हणायचा की आगाऊपणा?”. ही वाक्य ते न बोलताच आपली आपल्याला ऐकू येत राहतात. आईबाबा शेवटी थकून गेले तेच तेच विषय हाताळून. त्यांना माझं वागणं पटलं नव्हतंच पण ते मुलीला सपोर्ट करायचा म्हणून गप्प बसले होते. बाबांच्या बदल्या होतील तिथल्या गावात माझी संसार मांडत राहिली. हे तिचं प्रेम होतं. पण माझं तसं नाहीये. त्यामुळे घरात सुद्धा शीतयुद्ध सुरु झालं तसं मी आले शहर सोडून, मुंबईत. मुंबईच का? तर नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर ह्या सर्व गावात नातेवाईक आहेत. कोणत्याही रविवारी त्यांछा आधार म्हणून त्यांच्याकडए जेवायला जाऊन परत त्याच circle मध्ये फिरत रहायचं नव्हतं म्हणून!

तशी कामात मी चोख आहे पण बुद्धीनं बेतासबात. पण आता त्याला काही इलाज नाही. म्हणून मग माझ्यापरीनं जास्त काम करुन जेवढं तारुन नेता येईल तेवढं मी नेते. तास तास माझ्या जागेवरुन हलत नाही. चहा नाही, कॉफी नाही. गप्पाटप्पा नाहीत. तरीही हा सगळा time pass करणाऱ्या कोणाही पेक्षा माझं काम लवकर होत नाही. माझं लग्न माझ्या सोंदर्यावर ठरलं. सुंदर असल्यामुळे बऱ्याच गोष्टी कष्ट न करताच मला मिळत गेल्या. तसं बघायला गेलं तर सौंदर्य अजूनही आहे, एखादं affair सहज होऊ शकेल कारण आजूबाजूला ओळखीचे ही नाहीयेत, पण म्हणून दुसऱ्या पुरुषाबरोबर फिरुन त्याचा पैसा वापरणं नको वाटतं. कॉलेजमध्ये असताना मी हे केलं नाही असं नाहीये. तेव्हा आपण काय करतोय याचा सखोल विचार वगैरे करायच्या भानगडीत मी कधीच पडले नव्हते. पण जर मी आता तसं केलं तर ते ठरवून केल्यासारखं होईल. मला आता सौंदर्य, पुरुषांचं आकर्षण आणि तयातून होणारे फायदे व गळ्यात पडणाऱ्या अपेक्षा याची नीट माहिती आहे. पुन्हा मी असं केलं तर आईबाबा दुखावतील ते वेगळंच. आई वडिलांना माझ्या तत्वांसाठी वेगळं आणि अशा विचित्र गोष्टींसाठी दुखावणं फार वेगळं. या गोष्टी चुकीच्या आहेत की नाही हे मला माहित नाही. पण माझ्या यौवना रुममेट्स्‌नी हर तिसऱ्या दिवशी वेगळा मुलगा फ्लॅटवर आणला की मलाच विचित्र वाटतं. त्यामुळे तोमार्ग नको. समजा मी आले, बेल वाजवली आणि दार उघडायला माझ्या रुममेटनी अगदी एक मिनिट जरी जास्त घेतलं आणि आत आल्यावर जर मुलगा दिसला तर मी १००% judgemental होते. ती कूल असली तरीही. तिचा शांतपणा बघून असं वाटतं की नसेलच काही शरम वाटण्यासारखं. पण खात्री वाटत नाही. ते शंकेचं feeling मी माझ्या आईला या वयात देणं फारच भयंकर होईल.

स्टेशन आलं. उतरायची गरजच पडली नाही. आपोआप एक धक्का मला प्लॅटफॉर्मवर सोडून गेला. रोजच्यासारखा. या दारातून platform वर उतरलं की आणखी एक दिवस पार पडल्यासारखा वाटतो. आजही मी चालत्या लोकलमधून उडी मारली नाही. नाहीतर विचार करता करता दारातून कधीही बाहेरची उडी पडेल असं वाटत राहतं. अनेकदा केलाय मी आत्महत्येचा विचार. पण अजून आत्महत्या नाही केली. मला वा टतं आत्महत्या केली तर माझा अपमान होईल त्यानी. लोकं म्हणतील हिंमत नसताना नवऱ्यासमोर फणा काढला, आई-वडिलांना धाब्यावर बसवून ही गेली मुंबईला आणि मग काहि जमलं नाही. मला तो माझा पराभव वाटेल. गर्दीबरोबर झपझप पावलं चालली होती तशी पोटात एक कळ आली आणि जाणवलं की आपल्या नकळत आपण लघवी आवरुन धरलीये. रोज मी ऑफिसमधून निघताना मी निक्षून जाऊन येते, तरीही लोकल मधून उतरलं की येतोच सांगावा. वय बोलायला लागलंय. आता पृ्वसारखी तासनतास, बाथरुम सापडेपर्यंत लघवी नाही येत आवरता. माझ्या आईची menopause नंतरची phase मी फार जवळून बघितली, माझ्या लग्नाआधी. तिनं सांगितलं नाही कधी उकल करुन पण मला समजायचं. सतत तिची नजर बाथरुमच्या शोधात असायची. ट्रिपला गेलो की, गावात शॉपिंगला गेलो की, देवदर्शनाच्या रांगेत आणि अगदी सहज कोणाकडे चहाला गेलो तरीही. दुसऱ्याकडे मुक्काम तर ती टाळायचीच. आता माझ्या वाटेत एकही स्वच्छ बाथरुम नाही. थेट घरी गेल्यावरच. त्यात दोन्ही रुममेट यौवनांना बेल एेकू येत नाही. आलीच तर कोण उघडणार यावर किमान ५६ सेकंद घालवतात. ती माझ्या bladder साठी किती महत्त्वाची असतात, हे त्यांना चाळीशी ओलांडल्याशिवाय नाही समजणार. हा नेहमीचा दार उघडायचा प्रसंग आठवला आणि अंगावर काटा आला. आजकाल माझा लघवी लागण्यावर जसा ताबा नाही, तसाच तो ती करण्यावरही कमी झाला आहे. आपण म्हातारे होतोय, ही भावना फार वाईट. लग्नाचं मोजकंच सुख, त्यात मूलबाळ नाही, आई-वडील आहेत पण त्यांच्याजवळ जायचं म्हणजे त्यांना दुःखात टाकल्यासारखं. त्यामुळे आता मी आणि मला या दोन यौवना. एवढंच आयुष्य.

आमचं घर छान आहे. सोफा, टिव्ही, फ्रीज, बेड, कपाटं. सगळं सगळं आहे. पण यातलं मी काहीच घेतलं नाही. मी जेमतेम महिन्याचे पैसे देते. बाकी सगळं त्याच करतात. खरंतर लाज वाटते, पण पर्याय नाही. माझ्या नवऱ्यानी तिथं दुसरी बाई, बायको सारखी घरात आणून बसवली नसती तर मी त्याच्याकडून कर्ज घेतलं असतं, पण तिच्यासमोर पदर पसरणं मला जमणार नाही.

रिक्षाचे पैसे देऊन मी खाली उतरले तशी पोटत आळखी एक कळ आली आणि येणारी शिंक मी वाट्टेल ते झालं तरी दाबायची या प्रयत्नांनी दोन्ही नाकपुड्या घट्ट दाबून मारली. लघवी आणि शिंक म्हणजे भयंकर combination! आता या भरलेल्या bladder नी सहा मजले चढावे लागणार आहेत. लिफ्टचं बटन दाबून काहीच दिवा न लागल्यानं लिफ्ट कालपासून बंद आहे हे आठवलं. लिफ्टच्या शेजारचं सोसायटी trip चं poster मात्र या घाईत सुद्धा नजरेस पडलं आणि आज त्या किमान ५६ सेकंदांची वाट बघावी लागणार नाही हे सुद्धा आठवलं. कारण आज दरवाजा किल्लीनंच उघडायचा आहे. दोघी रुममेट्स सोसायटीतल्या लोकांबरोबर ट्रिपला गेल्या आहेत. पर्स उघडली, नेहमीच्या कप्पात किल्ली नसल्याचं आश्चर्य वाटलं. मी पर्स पालथी घालायला सुरुवात केली. मी किल्ली नेहमी जपून ठेवते. या मुलींचे महागडे लॅपटॉप, सगळं सामान तसंच वर असतं. मला उपकाराचं ओझं वाटतं. पण मग मी जेवण बनवून, घर आवरुन, त्यांचे कपडे धुवून ते जरासं हलकं करते. पण हलकं होतं नाही. माझ्यासारखी बाई २४ तास लावायची त्यांची एेपत आहे, हे त्यांनाही चांगलंच माहीतीये आणि मलाही. किल्ली अजूनही सापडेना. मी कुठे ठेवली? घरातून निघताना तर होती, कारण दार मीच लावलं. मग कुठे गेली? खरंतर मी बाहेर काढलीच नव्हती. माझी पर्स ऑफिसमध्ये माझ्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये सेफ असते. मला घाम फुटायला लागला. त्यात bladder प्रकरण भर घालत होतं. मी ठरवलं की किल्लीच्या शोधाशिवाय कुठेही जायचं नाही. ते जास्त महत्त्वाचं आहे. शेजारुन किल्ली घेण्याची सोयच नाही. ट्रिपला कॉलनी मधले सगळेच गेले आहेत. म्हणजे मग आता काय करावं?

पाऊण तास झाला. काहीही उत्तर सुचलेलं नाही. किल्ली कुठे गेली? लोकलच्या धक्क्यात कोणी घेतली का? मी इतकी म्हातारी झालीये का? मला आता एवढंही बघता येत नाही? या दोघी जर चुकून लवकर आल्या तर काय उत्तर देऊ? कुठे गेली किल्ली? एखाद्याकडे आश्रितासारखं राहत असताना, आपल्याकडून त्याच्या घराला आग लागल्यासारखं वाटलं.

मी ६ वर्षांची होते. माझ्या काकानं नवीन घर घेतलं होतं पुण्यात. आम्ही सगळे राहायला गेलो सुट्टीत. खूप धमाल करत होतो. एवढं मोठं घर खानदानात कोणाचं नव्हतं. पकडापकडी खेळताना मी जोरात धावले आणि मागून माझा मामेभाऊ आला का बघायला गर्‌कन मागे वळले. धक्का लागला आणि टिव्ही पडला. त्यानंतर इतका वेळ शांतता पसरली होती. मला काहीच समजेना. रडावं तर ते ही सुचलं नाही. माझी आई घाबरुन गेली होती. त्यानंतर मला काहीच एेकू आलं नाही. आलं ते थेट हेच की बाबा म्हणाले, मी भरपाई देईन. त्यानंतर ओव्हरटाईम करत बाबा एक महिना उशीरा येत. मला झोपवून आई त्यांची जेवायला वाट बघत बसायची. त्यातला एकही दिवस मी झोपले नव्हते. टक्क जागी असायचे. सकाळी बाबा ऑफिसला गेले की आईला बिलगून रडायचे. आज तिची फार आठवण येतीये. त्या दिवसानंतर तितकं भयाण मला थेट आज वाटतंय. तेव्हा मी कोणाचीच माफी मागितली नव्हती. मला माझी चूक खोलवर पटली होती, पण मी ते व्यक्त केलं नव्हतं. आई म्हणायची नेहमी, “उपकार घेणं महागातच पडतं, पटेल एक दिवस”. मला ते वाक्य खोटं ठरवलंच पाहिजे. दुसऱ्याचं माझ्याकडून असं नुकसान झालंय तर मी जरुर माफी मागणार. असं काहीतरी करेन की ते उपकारच राहणार नाहीत. की मेकरचे पैसे मीच भरेन. सगळ्या किल्ल्या परत ड्युप्लिकेट करणं वगैरे माझं प्रायःश्चित्त. लहानपणी मी लहान होते. ती सल अजून पुसली गेली नाही. आता मी मोठी झाले आहे. घरातली सगळ्यात मोठी व्यक्ती. जबाबादारी माझीच असायला हवी.

आता मात्र ही लघवी सहन होत नाही. पोटात आत आत कळा यायला लागल्या आहेत. पण मी गेले इथून आणि त्या दोघी आल्या तर? आजच रात्री परतणार आहेत. आता मलाच येऊन दोनेक तास झाले. बापरे, साडेनऊ वाजले की. मला बिल्डिंग समोरचं सुलभ शौचालय डोळ्यासमोर यायला लागलं. इथेच थांबणं खरंतर योग्य आहे. पटकन्‌ जाऊन यायचा मोह तर होतोय, पण विशाखानं मला विचारलं होतं की आम्ही येऊ तर तू असशील ना? त्यांच्याकडे किल्ली नाही. नेहमी तर नेतात पण कधीकधी राहून जाते. मी घरी नाही असं होतंच नाही. त्यांच्याच घराच्या दारात त्यांना उभं करणं म्हणजे मलाच नकोसं होणार आणि बिल्डिंगमध्ये माझ्या गायब होण्याची बातमी पसरणार. मग खालची शहा भाभी त्यांना बसायला बोलावणार. त्या जाणार. मग आल्यावर मला शहा भाभीसमोर त्यांना किल्ली हरवल्याचं सांगावं लागणार. अगदी नकोसं होईल ते. त्यापेक्षा इथेच थांबावं. किंवा सरळ की मेकर बोलवावा. आत्ताच. पण त्यानं लॅच मोडलं तर? घर भाड्याचं आहे. त्यात मी डिपॉजिट तरी कुठे दिलंय? नकोच.

मी जिना उतरायला सुरुवात केली. बुद्धीला कितीही थांबायचं असलं तरी आता मला ते शक्य होणार नव्हतं. सुर्वेंच्या सेंडऑफचा सामोसा पोटात गुडगुडतोय. आता १ बरोबर २ ची काय गरज होती, कोणास ठाऊक. पर्समधून ५ रुपये काढत मी रस्ता ओलांडला. मनात दोनच प्रार्थना. पैसे घेतात म्हणजे टॉयलेटनं स्वच्छ असावं आणि मी घरी जाईपर्यंत या मुलींनी न परतावं. मी टॉयलेटच्या आत शिरले तर तोब्बा लाईन. एकदा वाटलं परत जावं. पण आता ते खरंच शक्य नव्हतं. लाईन कशी पुढे सरकली, कसा माझा नंबर आला आणि मी कशी काय सगळं उरकून बाहेर आले? काही काही आठवत नाही.

माझ्या चाळीशी ओलांडलेल्या दमलेल्या गुडघ्यांनी मनाशी हिय्या करुन दिवसातला बारावा की तेरावा जिना चढायला सुरुवात केली. आॅफिस तीन मजली आहे. सतत वर खाली चालूच असतं. संध्याकाळ पर्यंत पिट्ट्या पडतो. मी अंदाज घेत होते, पण बिल्डिंगमध्ये शांतता होती. लोकं आपापल्या घरात जाणं, सामान नेणं, एकमेकांना गुडनाईट म्हणणं, यातलं काहीही सुरु नव्हतं. मला इतकं हुश्‌श्‌श्‌ झालं की बस्स… मी आमच्या मजल्यावर येऊन पायरीवर माझं बुढ टेकवलं. कोण जाणे का, काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. मी वीजेचा झटका लागल्यासारखी उठले आणि धावत घरात गेले. दार उघडं होतं. म्हणजे विशाखानं किल्ली नेली होती. आनंदात आत जाऊन दोघींसाठी आणलेली कच्छी दाबेली बाहेर काढली आणि मी तशीच उभी राहिले. समोर टिव्हीच नव्हता, सोफ्यात पल्लवीचा लॅपटॉप नव्हता. खोलीत कपाटं उघडी होती. मी दोघींसाठी तीन तीन तोळे जमवलेलं सोनं नव्हतं, पल्लवीच्या कपाटाचा ड्रॉवर रिकामा होता. विशाखाची लटकणारी पर्स गायब होती. माझ्या हातातल्या दाबेली तिथेच पडल्या. मी जड पावलानी हॉलमध्ये आले आणि समोर बघते तर विशाखा, पल्लवी, शहा भाभी, रहेजा भाभी, दिलीपभाई… आणि माहित नाही कोण कोण होतं. सगळे सुन्न. तोंडातून चकार नाही माझ्या. जसं की सामान नाही, माझा होता-नव्हता कणाच चोरीला गेला!